भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल, २४ नेत्यांना नवीन जबाबदाऱ्या
नवी दिल्ली, २४ सप्टेंबर (हिं.स.)भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने विविध राज्यांतील नेत्यांना नवीन संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. सर्व नियुक्त्या तात्काळ प्रभावाने लागू
भाजपकडून दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि त्रिपुरासाठी नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती


नवी दिल्ली, २४ सप्टेंबर (हिं.स.)भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने विविध राज्यांतील नेत्यांना नवीन संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. सर्व नियुक्त्या तात्काळ प्रभावाने लागू होतील.

भाजपच्या एकूण २४ नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय सह-महासचिव (संघटन), राज्य सह-महासचिव (संघटन) आणि राज्य सह-महासचिव (संघटन) यांसारख्या विविध महत्त्वाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्यांचा समावेश आहे. शिव प्रकाश यांना राष्ट्रीय सह-महासचिव (संघटन) पदाची जबाबदारी देण्यात आली असून त्यांच्याकडे आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गोवा या राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सौदान सिंग यांच्याकडे बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

बी. सतीश यांच्याकडे एससी-एसटी मोर्चा आणि संसदीय कार्यालयाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर नागेंद्र यांच्याकडे संघटना आणि वरिष्ठ कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अजय जमवाल यांची महाराष्ट्रासाठी राज्य महासचिव (संघटन) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सतीश धोंड यांच्याकडे महाराष्ट्रासाठी राज्य सहमहासचिव (संघटन) पदाची जबाबदारी, तसेच गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातील आदिवासी संपर्क कार्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

इतर नियुक्त्यांमध्ये, मधुकर यांच्याकडे आंध्र प्रदेश आणि तेलंगणासाठी कार्यालय बांधकामाची, दशरथ यांच्याकडे तेलंगणासाठी, आणि रवींद्र राजू यांच्याकडे आसाम आणि त्रिपुरासाठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भीमाबाई दलसानिया यांची बिहारसाठी, पवन साई यांची झारखंडसाठी, आणि सिद्धार्थन यांची हिमाचल प्रदेशसाठी राज्य महासचिव (संघटन) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त, रत्नाकर यांची गुजरात, दादरा आणि नगर हवेली, आणि दमण आणि दीवसाठी; अरुण बिनवाडी यांची गुजरातसाठी; फणींद्रनाथ शर्मा यांची उत्तराखंडसाठी; पवन राणा यांची दिल्ली आणि हरियाणासाठी; कर्मवीर यांची छत्तीसगडसाठी; आणि चंद्रशेखर यांची मध्य प्रदेशसाठी राज्य महासचिव (संघटन) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ओडिशासाठी मानस मोहंती, पंजाब आणि चंदीगडसाठी मंत्री श्रीनिवासुलू, उत्तर प्रदेशसाठी धरमपाल आणि पश्चिम बंगालसाठी अमिताभ चक्रवर्ती यांची राज्य महासचिव (संघटन) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनात्मक स्तरावर, अभय गिरी यांना ब्रज विभागाचे संघटक आणि अनंत नारायण मिश्रा यांना भागलपूर, पूर्णिया आणि कोसी विभागाचे संघटक बनवण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande