

- सतीश धोंड प्रदेश सह संघटन मंत्री
मुंबई, 24 सप्टेंबर (हिं.स.) - भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाला मिळाले नवीन संघटन महामंत्री अजय जामवाल यांची महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या संघटन महामंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वी ते मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या दोन प्रदेशांचे संघटन मंत्री होते आज पासून त्यांचे मुंबई हे केंद्र असणार असून बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असलेले संघटन महामंत्री या जबाबदारीत श्री अजय जामवाल यांची नियुक्ती झाली आहे.
विदर्भावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी महत्त्वाची नियुक्ती. महाराष्ट्र प्रदेश सह संघटन मंत्री या जबाबदारी अतिशय अनुभवी व बंगाल तसेच अनेक प्रदेशांच्या निवडणुका आणि भारतीय जनता पार्टीच्या संघटन व जनजाती मोर्चा सारख्या महत्त्वपूर्ण आघाडीचा अखिल भारतीय अनुभव असलेले श्री सतीश धोंड यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश सह संघटन मंत्री पदावर करण्यात आली आहे त्यांचे केंद्र हे नागपूर असणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी