
रत्नागिरी, 3 सप्टेंबर (हिं.स.) । सातबारा उताऱ्यात फेरफार करण्याच्या कामासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना चिपळूण तालुक्यातील मंडल अधिकारी उमेश राजेशिर्के यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदाराच्या सातबारा उताऱ्यात फेरफार करण्याचे काम होते हे काम करून देण्यासाठी मंडल अधिकारी उमेश राजेशिर्के यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने पथकाने सापळा रचला.
चिपळूण शहरातील पाग पॉवर हाऊस परिसरातील एका हॉटेलमध्ये तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना उमेश राजेशिर्के यांना पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईनंतर त्यांच्याविरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी