
रायगड, 03 सप्टेंबर (हिं.स.)। खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे खालापूर येथील स्वामी समर्थ मठात अज्ञात दोन आरोपींनी प्रवेश करून लाकडी पादुका व चांदीचे आवरण असा एकूण १ लाख ६० हजार ५२२ रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामी समर्थ मठाचे दरवाजे उघडे असल्याचा फायदा घेत अज्ञात दोन आरोपींनी मठात प्रवेश केला. त्यानंतर मठातील लाकडी पादुका तसेच चांदीचे आवरण फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या उद्देशाने चोरी करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हाके करीत आहेत. आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक तपास व कारवाई करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)