जळगावात ३.५ किलो गांजा जप्त; दोघे ताब्यात
जळगाव , 03 सप्टेंबर (हिं.स.) नाशिराबाद परिसरात गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांवर पोलिसांनी कारवाई करत ३ किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त केला. पोलिसांच्या या कारवाईत गांजासह दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल ह
जळगावात ३.५ किलो गांजा जप्त; दोघे ताब्यात


जळगाव , 03 सप्टेंबर (हिं.स.) नाशिराबाद परिसरात गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांवर पोलिसांनी कारवाई करत ३ किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त केला. पोलिसांच्या या कारवाईत गांजासह दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नाशिराबाद परिसरात गांजाची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी साई बाजार चौक परिसरात सापळा रचला. संशयास्पद हालचाली करताना राजेश भारत बाळू (रा. तांबापुरा, जळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २ किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता हा गांजा नाशिराबाद येथील सुभाष सोमा मराठे याला देण्यासाठी आणल्याचे समोर आले.त्यानंतर पोलिसांनी सुभाष मराठे यालाही ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींकडून मिळून ३ किलो ५०० ग्रॅम गांजा पोलिसांच्या हाती लागला. या कारवाईत गांजासोबत दुचाकी आणि दोन मोबाईल असा सुमारे २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, गांजाचा पुरवठा नेमका कुठून होत होता आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद पोलीस ठाण्याच्या प्रभारी एपीआय योगिता नारखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. कारवाईदरम्यान गांजासह दोन लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande