
सोलापूर, 07 सप्टेंबर (हिं.स.)।
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे महसूल विभागातील पाच जिल्ह्यांसाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांची ‘मतदार यादी निरीक्षक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) 2026 अंतर्गत दावे व हरकती स्वीकारण्याच्या टप्प्यात मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले मंगळवार, दि. 8 सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
दौऱ्यादरम्यान त्या सकाळी 6.30 वाजता पुण्याहून सोलापूरकडे प्रयाण करून शासकीय विश्रामगृह येथे येतील. सकाळी 10.45 ते 11.30 या वेळेत नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात विद्यमान खासदार, आमदार तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात येणार आहे.
यानंतर सकाळी 11.30 ते दुपारी 12 या वेळेत जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील २४८-सोलापूर शहर उत्तर, 249-सोलापूर शहर मध्य आणि 251-सोलापूर शहर दक्षिण या मतदारसंघांच्या निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO) कार्यालयांची एकत्रित पाहणी केली जाणार आहे.
दुपारी 12 ते 12.30 या वेळेत सिद्धेश्वर हायस्कूल/सोशल हायस्कूल येथे 249-सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 20 ते 22 आणि 8, 17 ते 19 या केंद्रांची पाहणी केली जाणार असून, यावेळी बीएलओ तसेच मतदारांशी संवाद साधण्यात येणार आहे.
त्यानंतर दुपारी 12.30 ते 12.50 या वेळेत शरदचंद्र पवार प्रशाला/लोकमंगल प्रशाला येथे 248-सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 111 ते 133 ची पाहणी करण्यात येणार आहे.
दुपारी 12.50 ते 1.15 या वेळेत बसवेश्वर नगर/देगाव गावठाण येथे 252-सोलापूर दक्षिण मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 140 ते 150 ची पाहणी करून बीएलओ व मतदारांशी संवाद साधला जाणार आहे.
पाहणी दौरा पूर्ण केल्यानंतर दुपारी 1.50 वाजता देगाव (सोलापूर) येथून त्या सांगली जिल्ह्याकडे प्रयाण करतील.
--
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड