भोगाव येथील आर्केस्ट्रा बारवर पोलिसांची धाड; १५ महिला व ग्राहक ताब्यात
सोलापूर, ७ सप्टेंबर (हिं.स.) : सोलापूर शहरालगतच्या भोगाव परिसरातील सुखसागर आर्केस्ट्रा बारवर ग्रामीण पोलिसांनी अचानक छापा टाकून मोठी कारवाई केली. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत बारमध्ये कथितरित्या अश्
Civel Hospital


सोलापूर, ७ सप्टेंबर (हिं.स.) : सोलापूर शहरालगतच्या भोगाव परिसरातील सुखसागर आर्केस्ट्रा बारवर ग्रामीण पोलिसांनी अचानक छापा टाकून मोठी कारवाई केली. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत बारमध्ये कथितरित्या अश्लील नृत्यप्रकार सुरू असताना १५ महिला व ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी अचानक धाड टाकल्याने बार परिसरात एकच खळबळ उडाली. बारमध्ये बेकायदेशीर पद्धतीने नृत्याचे आयोजन करून ग्राहकांचे मनोरंजन केले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. कारवाईदरम्यान घटनास्थळावरून मोबाईल फोन, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा सुमारे २९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी संबंधित आर्केस्ट्रा बारचे मालक, चालक तसेच इतर संबंधितांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे भोगाव परिसरासह सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आस्थापनांमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. भोगाव येथील कारवाईनंतर जिल्ह्यातील इतर आर्केस्ट्रा बार, परमिट रूम आणि संबंधित आस्थापनांमध्येही पोलिसांच्या कारवाईची धास्ती निर्माण झाली आहे.

दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या सुमारे २९ लाख रुपयांच्या मुद्देमालामध्ये नेमके कोणते साहित्य समाविष्ट आहे आणि ही कारवाई कोणत्या कायदेशीर तरतुदींनुसार करण्यात आली, याबाबत पोलिसांच्या पुढील तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande