
खासदार बजरंग सोनवणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत
बीड, ७ सप्टेंबर (हिं.स.) : पू. नारायणदादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावर्षीचा पू. नारायणदादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्कार ग्रामोद्योगिक शिक्षण मंडळ संचालित एम.आय.टी., छत्रपती संभाजीनगरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. यज्ञवीर कवडे यांना खासदार बजरंग सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यादरम्यान ‘नारायणदादा काळदाते उच्चशिक्षण सहाय्यता निधी’ या उपक्रमांतर्गत गरजू, गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली. शिक्षणापासून आर्थिक अडचणींमुळे कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, या उद्देशाने राबविण्यात येत असलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देणारा ठरत आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देतानाच सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. पुरस्कारार्थी डॉ. यज्ञवीर कवडे तसेच आर्थिक मदत मिळालेल्या सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळत असून, समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळत आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis