छ. संभाजीनगर जिल्ह्यातील मराठा-कुणबी नोंदी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध
छत्रपती संभाजीनगर, 07 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आढळलेल्या मराठा कुणबी, कुणबी मराठा नोंदींची माहिती जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन करुनही ही माहिती लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन द
छ. संभाजीनगर जिल्ह्यातील मराठा-कुणबी नोंदी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध


छत्रपती संभाजीनगर, 07 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आढळलेल्या मराठा कुणबी, कुणबी मराठा नोंदींची माहिती जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन करुनही ही माहिती लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिली आहे.

दरम्यान प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सुचना फलकावर त्या त्या गावातील याद्या प्रदर्शित कराव्या असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दुरदृष्यप्रणालीद्वारे दिले आहेत. मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा अशा जात नोंदींची माहिती जुन्या दस्तऐवजांवरुन सापडल्या आहेत. त्यांची संख्या जिल्ह्यात ५११३ आहे. तालुकानिहा या नोंदी याप्रमाणे, सोयगाव ३१, पैठण-१८४, वैजापूर-६८७, सिल्लोड- ३५७, गंगापुर-७६१, खुलताबाद-३४१, फुलंब्री-२६१, छत्रपती संभाजीनगर-१०३९ व कन्नड-१४५२ इतक्या आहेत. या सर्व नोंदी व त्यांचे दस्तऐवज डिजीटल स्वरुपात जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. https://chhatrapatisambhajinagar.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर या नोंदी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

संकेतस्थळावर मराठा कुणबी दस्त नोंदी असा स्वतंत्र टॅग उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यावर जाऊन प्रत्येक तालुकानिहा नोंदी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यावर क्लिक करुन नोंदींची यादी, नाव व दस्ताचा प्रकार पाहता येतो. दस्त यावर क्लिक केल्यास प्रत्यक्ष दस्तही डिजीटल स्वरुपात प्रमाणित केलेली प्रत पाहता येते. दरम्यान या संदर्भात आज राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. त्यात त्यांनी निर्देश दिले की, प्रत्येक जिल्ह्यात मंडळनिहाय शिबिरे आयोजीत करुन लोकांना ह्या याद्या पहावयास उपलब्ध करुन द्याव्या. मराठवाड्यात येत्या दि.१७ रोजी विशेष ग्रामसभा घेऊनही माहिती देण्याचे नियोजन करता येईल,असे विखे पाटील यांनी सांगितले.

तसेच संकेतस्थळावर नोंदी उपलब्ध करुन देण्याच्या पुढाकाराच्या प्रयत्नाची विखे पाटील यांनी वाखाणणी केली. तसेच या नोंदींपैकी मोडी लिपी, ऊर्दू नोंदींच्या भाषांतर, लिप्यांतराचीही सोय उपलब्ध करुन द्यावी,असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात मंडळनिहाय शिबिरे

जिल्ह्यात दि.१० ते १७ दरम्यान सर्व तालुक्यात मंडळनिहाय कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वितरण, तसेच याद्या पाहण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

ते याप्रमाणे- अपर तहसिल छत्रपती संभाजीनगर- (एकूण मंडळ-५) दि.१० भावसिंगपुरा, दि.११- पंढरपूर, दि.१२ कांचनवाडी, दि.१५ उस्मानपुरा, दि.१७ – छत्रपती संभाजीनगर.

छत्रपती संभाजीनगर (एकूण मंडळ-९)- दि.१०-चौका, दि.११ वरुड काझी, पिसादेवी, दि.१२- शेकटा, लाडसावंगी, दि.१५- चिकलठाणा, करमाड, दि.१६-कचनेर, चित्तेपिंपळगाव.

पैठण (एकूण मंडळ-१२)- दि.१०-पाचोड, आडूळ, दि.११-आपेगाव, विहामांडवा, दि.१२- पैठण, पिंपळवाडी, दि.१५-बालानगर, नादर, दि.१६-ढोरकीन, निलजगाव, दि.१७-बिडकीन, लोहगाव.

फुलंब्री (एकूण मंडळ-५)- दि.१०-आळंद, दि.११-बाबरा, दि.१५-पिरबावडा, दि.१६-वडोद बाजार.

खुलताबाद(एकूण मंडळ-४)- दि.१०- खुलताबाद, दि.११- वेरुळ, दि.१२- सुलतानपूर, दि.१३- बाजारसावंगी.

कन्नड (एकूण मंडळ-१०)- दि.१०-नाचनवेल, चिंचोली, लिंबाजी, दि.११- देवगाव रंगारी, चापानेर, दि.१२-हतनूर, चिकलठाण, दि.१३-कन्नड- नागद, दि.१५- करंजखेडा.

सिल्लोड (एकूण मंडळ-११)- दि.१०-भराडी, बोरगाव बाजार, आमठाणा, दि.११- सिल्लोड, पालोद, निल्लोड, दि.१५- अंभई, दि.१६-अजिंठा, शिवना, दि.१७-गोळेगाव बु., उंडणगाव.

सोयगाव (एकूण मंडळ-४)- दि.११- सोयगाव, सावळदबारा, दि.१५-जरंडी, दि.१६- बनोटी.

गंगापूर(एकूण मंडळ-१२)- दि.१०-वाळूज, तुर्काबाद, दि.११-आसेगाव, गाजगाव, दि.१२- हर्सूल, डोणगाव, दि.१५-सिद्धनाथ वडगाव, गंगापूर, दि.१६- मांजरी, जामगाव, दि.१७- भेंडाळा, शेदूरवादा.

वैजापूर(एकूण मंडळ-१२)- दि.१२- गारज, शिऊर, दि.११- लोणी खु., जानेफळ, दि.१२- खंडाळा, बोरसर, दि.१५-लासूरगाव, महालगाव, दि.१६- बाबतरा, नागमठाण, दि.१७-वैजापूर, घायगाव.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande