
पश्चिम जिल्हा कार्यकारिणी बैठकीत साधला संवाद
छत्रपती संभाजीनगर, ७ सप्टेंबर (हिं.स.) : भारतीय जनता पार्टी, छत्रपती संभाजीनगर पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीस दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी उपस्थित राहून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी आगामी काळातील संघटनात्मक कामकाज, विविध उपक्रम तसेच पक्षाची पुढील वाटचाल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने समन्वयाने तसेच पूर्ण क्षमतेने काम करण्याचे आवाहन मंत्री अतुल सावे यांनी केले.
“भाजपाची संघटनशक्ती हीच जनसेवेची खरी ताकद आहे,” असे प्रतिपादन अतुल सावे यांनी यावेळी केले. पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासोबतच जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून विविध सामाजिक व जनहिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.
बैठकीत आगामी काळातील पक्षाच्या कार्यक्रमांचे नियोजन, संघटनात्मक जबाबदाऱ्या आणि कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागाबाबतही चर्चा करण्यात आली.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis