स्थानिकांच्या रोजगारासाठी चंद्रपुरात महामोर्चा
चंद्रपूर, 07 सप्टेंबर (हिं.स.)। स्थानिक भूमिपुत्रांना ८० टक्के रोजगार मिळावा, या मागणीसाठी चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक लोकाधिकार सेनेच्या वतीने सोमवारी (ता. ७) चंद्रपुरात रोजगार हक्क महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाध्यक्ष गोमती पाचभाई यांच
स्थानिकांच्या रोजगारासाठी चंद्रपुरात महामोर्चा


चंद्रपूर, 07 सप्टेंबर (हिं.स.)। स्थानिक भूमिपुत्रांना ८० टक्के रोजगार मिळावा, या मागणीसाठी चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक लोकाधिकार सेनेच्या वतीने सोमवारी (ता. ७) चंद्रपुरात रोजगार हक्क महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाध्यक्ष गोमती पाचभाई यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौकातून निघालेल्या मोर्चाला खुद्द उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संबोधित करीत सर्व मागण्या पूर्ण करण्यीची हमी दिली.

मोर्चाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तातडीने चंद्रपूर गाठले. त्यांनी आंदोलकांशी संवाद साधत स्थानिक युवकांसाठी रोजगार प्रशिक्षण केंद्र उभारण्यासह स्थानिक उद्योगांशी समन्वय साधून ८० टक्के स्थानिक रोजगाराच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर उपस्थित होते. कोळसा, वीज, खनिज संपत्ती आणि मोठ्या उद्योगांनी समृद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक युवकांना मात्र रोजगारासाठी संघर्ष करावा लागत असल्याचा मुद्दा आंदोलकांनी मांडला. उद्योगांसाठी स्थानिकांच्या जमिनी संपादित होतात, प्रदूषण व विस्थापनाचा फटका स्थानिकांना बसतो; मात्र रोजगाराच्या वेळी परराज्यातील कामगारांना प्राधान्य दिले जाते, असा आरोप करण्यात आला.दरम्यान, स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराच्या मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास तीव्र जनआंदोलन, चक्काजाम आणि कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक लोकाधिकार सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande