बीड जिल्ह्यातील रखडलेले विकासप्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी
शिवसेनेच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांंना निवेदन बीड, ७ सप्टेंबर (हिं.स.) : बीड जिल्ह्यातील रखडलेले आणि प्रलंबित विकासाचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, तसेच जिल्ह्यात विकासाभिमुख प्रकल्पांना गती द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आ
अ


शिवसेनेच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांंना निवेदन

बीड, ७ सप्टेंबर (हिं.स.) : बीड जिल्ह्यातील रखडलेले आणि प्रलंबित विकासाचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, तसेच जिल्ह्यात विकासाभिमुख प्रकल्पांना गती द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेना नेते तथा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेऊन निवेदन साद करण्यात आले.

यावेळी बीड जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित विविध प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील अनेक विकासकामे विविध कारणांमुळे रखडलेली असून, त्याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन संबंधित प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विकासाभिमुख प्रकल्पांना प्राधान्य देऊन ते वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि जिल्ह्याच्या विकासाशी निगडित प्रश्नांवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

या वेळी बीड जिल्ह्यातील शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande