राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत जिल्ह्यातील मंडळांना सहभागी होण्याचे आवाहन
नाशिक, 07 सप्टेंबर (हिं.स.)। , : शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्सव’ अंतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ आयो
District mandals should


नाशिक, 07 सप्टेंबर (हिं.स.)।

, : शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्सव’ अंतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 11 सप्टेंबर, 2026 पर्यंत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये पर्यावरणपूरक व पारंपरिक गणेशोत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन देणे, सामाजिक उपक्रम, जनजागृती व सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना देणे, तसेच स्वच्छता, सुरक्षा, शिस्तबद्ध आयोजन आणि सामाजिक बांधिलकी यांना प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांनी ११ सप्टेंबर, २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज व स्पर्धेसंदर्भातील सविस्तर माहिती https://ganeshotsav.pldmka.co.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन असून आवश्यक कागदपत्रे व माहिती संकेतस्थळावर अपलोड करावी लागणार आहे. अर्जाची पावती ई-मेल अथवा एसएमएसद्वारे प्राप्त होणार आहे.

स्पर्धेच्या निकषांमध्ये पर्यावरणपूरक व पारंपरिक गणेशोत्सव साजरा करणे, सामाजिक उपक्रम व जनजागृती तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, मंडप व देखाव्यासाठी सर्जनशीलता व सौंदर्य, स्वच्छता व सुरक्षिततेची काळजी व व्यवस्थापन, डिजिटल माध्यमांचा सर्जनशील व सकारात्मक वापर तसेच नियमांचे पालन आणि शिस्तबद्ध आयोजन या बाबींचा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन पर्यावरणपूरक, सामाजिक बांधिलकी जपणारा आणि शिस्तबद्ध गणेशोत्सव साजरा करण्याच्या उपक्रमाला बळ द्यावे, असेही आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी श्री. शिंदे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande