
छत्रपती संभाजीनगर, 07 सप्टेंबर (हिं.स.)। पैठण तालुक्यातील मौजे ब्रम्हगाव (चतुर्थ फेरी) व मौजे हिरडपुरी (प्रथम फेरी) येथील शासकीय वाळू डेपोमधील शिल्लक वाळूसाठ्याची ई-निविदा व ई-ऑक्शन पद्धतीने लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली आहे.
लिलावासाठी ऑनलाइन नोंदणी दि. ८ ते २२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत करता येईल. ऑनलाइन ई-अक्शन प्रक्रिया दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत होणार आहे. लिलावाच्या सविस्तर अटी व शर्ती, हातची किंमत तसेच अन्य माहिती http://mahatenders.gov.in व https://chhatrapatisambhajinagar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच उपविभागीय अधिकारी पैठण-फुलंब्री व तहसील कार्यालय, पैठण येथे उपलब्ध आहे,असेही कळविण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis