
छत्रपती संभाजीनगर, 07 सप्टेंबर (हिं.स.)। ढोकी येथील फळ रोपवाटिकेच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढून संबंधित अतिक्रमणधारकांविरोधात मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.. त्यांच्या मागण्या, अडचणी आणि प्रशासनाकडून अपेक्षित असलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती आमदार पाटील यांनी जाणून घेतली. त्यांच्या मागण्यांबाबत शासन आणि प्रशासन स्तरावर पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा यावेळी विश्वास दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis