तपोवनातील वृक्षतोड प्रकरणाची मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी
High Court to hear Tapovan tree felling case today
तपोवनातील वृक्षतोड प्रकरणाची मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी


कुंभमेळ्यापूर्वी स्थगितीच्या निर्णयाची शक्यता

नाशिक, 07 सप्टेंबर (हिं.स.) : तपोवनातील वृक्षतोडीच्या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात ८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. याचिकाकर्ते नितीन पंडित यांनी केलेल्या ‘तातडीच्या सुनावणी’च्या मागणीला मागील तारखेला न्यायालयाने मान्यता दिली आहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील वृक्षतोडीची शक्यता लक्षात घेता पुढील सुनावण्यांना जवळच्या तारखा देऊन प्रकरण फास्ट ट्रॅकवर घेण्यात येणार आहे. कुंभमेळ्याची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी नाशिक महानगरपालिकेकडून तपोवनातील वृक्षतोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लवकर सुनावणी घेऊन वृक्षतोडीवर स्थगिती मिळविण्याचा याचिकाकर्त्यांचा प्रयत्न आहे. सुनावणी निर्णायक दिशेने सुरू असून ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणापूर्वी तपोवनातील वृक्षतोडीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande