छ. संभाजीनगर : महादेव मंदिर सभामंडपाच्या स्लॅब कामाचा शुभारंभ
छत्रपती संभाजीनगर, ७ सप्टेंबर (हिं.स.) : श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिर, धानोरा फाटा येथे सभामंडपाच्या स्लॅब टाकण्याच्या कामाचा शुभारंभ संत-महंतांच्या उपस्थितीत करण्यात आला. प्रभू श्रीराम मंदिर व मुर्डेश्वर महादेव मंदिराचे पीठाधीश प.पू. ब्रह्मली
अ


छत्रपती संभाजीनगर, ७ सप्टेंबर (हिं.स.) : श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिर, धानोरा फाटा येथे सभामंडपाच्या स्लॅब टाकण्याच्या कामाचा शुभारंभ संत-महंतांच्या उपस्थितीत करण्यात आला. प्रभू श्रीराम मंदिर व मुर्डेश्वर महादेव मंदिराचे पीठाधीश प.पू. ब्रह्मलीन काशिगिरी महाराज यांच्या स्मृती व आशीर्वादाने हे काम सुरू आहे.

श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिराचे पीठाधीश प.पू. सर्वानंद सरस्वती महाराज आणि गहीनाथ संस्थानचे पीठाधीश प.पू. जगन्नाथ महाराज गिरी यांच्या शुभहस्ते सभामंडपाच्या स्लॅब टाकण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.

या पवित्र प्रसंगी संत-महंत, विविध पदाधिकारी तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिराच्या विकासकामांना गती मिळत असून, भाविकांसाठी अधिक सुंदर, प्रशस्त आणि सोयी-सुविधांनी युक्त धार्मिक परिसर साकारण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

मंदिर परिसरातील सुरू असलेल्या विकासकामांमुळे भाविकांना आगामी काळात अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून, धार्मिक व आध्यात्मिक वातावरण अधिक समृद्ध होण्यास मदत होणार आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande