थोर स्वातंत्र्यसैनिक दगडाबाई देवराव शेळके यांच्या स्मारकाची पाहणी
छत्रपती संभाजीनगर, 07 सप्टेंबर (हिं.स.)। मराठवाड्याच्या ‘झाशीची राणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोर स्वातंत्र्यसैनिक दगडाबाई देवराव शेळके यांच्या स्मारकाची शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी पाहणी केली.. स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची पर्वा न करता
अ


छत्रपती संभाजीनगर, 07 सप्टेंबर (हिं.स.)।

मराठवाड्याच्या ‘झाशीची राणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोर स्वातंत्र्यसैनिक दगडाबाई देवराव शेळके यांच्या स्मारकाची शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी पाहणी केली..

स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची पर्वा न करता ब्रिटिश सत्तेविरोधात संघर्ष करणाऱ्या आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या दगडाबाई शेळके यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्या स्मारकाची घोषणा केली होती. मात्र घोषणेला अनेक वर्षे उलटून गेली, तरी प्रत्यक्षात स्मारकाच्या कामाची प्रगती शून्य आहे.

आज प्रस्तावित स्मारक परिसराची पाहणी केली असता संपूर्ण परिसराची झालेली दुरवस्था आणि भग्नावस्था पाहून शासनाच्या विकासाच्या दाव्यांची पोलखोल होते. एका महान स्वातंत्र्यसैनिकेच्या स्मारकाची अशी अवस्था असणे ही प्रशासकीय उदासीनता नसून, त्यांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा अवमान आहे..

ज्यांनी देशासाठी आयुष्य वेचले, त्यांच्या स्मृतींसाठी सरकारकडे वेळ नाही; मात्र घोषणांच्या जाहिराती आणि श्रेयवादासाठी मात्र सरकारकडे मुबलक वेळ आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे..

मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषणा करणे, भूमिपूजनाचे फलक लावणे आणि त्यानंतर कामाकडे पाठ फिरवणे हा विकास नव्हे. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला साजेसे स्मारक उभे करणे ही सरकारची जबाबदारी आहे..

दगडाबाई शेळके यांचा संघर्ष, शौर्य आणि देशासाठी केलेला त्याग हा मराठवाड्याच्या इतिहासाचा अभिमान आहे. हा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी स्मारकाचे काम तातडीने सुरू करून ते दर्जेदार आणि नियोजित पद्धतीने पूर्ण करावे, अशी आमची मागणी आहे..

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande