
छत्रपती संभाजीनगर, 07 सप्टेंबर (हिं.स.)।
सव्वा ते तीन करोड मराठा मुंबईत येऊ शकतो, यावेळी आंदोलकांनी स्व-संरक्षासाठी झाडू ठेवावा, आजपासून कामाला लागा, सर्वांनी 12 तारखेला अंतरवालीमध्ये यायचं आहे, असे आवाहनही मराठा बांधवांना जरांगे पाटलांनी केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मंत्र उदय सामंत यांनी भाष्य केलंय. विखे पाटील यांनी आत्ताच ऑनलाईन बैठक घेतली आहे, मीही त्यात होतो, सगळे अधिकारी त्यात होते, आम्ही यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या माध्यमातून देखील मी जरांगे पाटील यांना विनंती करेल की, त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, प्रश्न सुटतच राहणार आहेत, पण आपली प्रकृती, आपला जीव देखील महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने त्यांनी आंदोलन स्थगित करावं, अशी विनंती उदय सामंत यांनी चंद्रपूर दौऱ्यात असताना केली. दरम्यान, ओबीसी समाजाचं आरक्षण कुठल्याही प्रकारे कमी होणार नाही असं महायुती सरकारचं धोरण आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील हे घोषित केलं आहे की, ओबीसी समाजाच्या कुठल्याच आरक्षणाला धक्का लागणार नाही, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis