नांदेडमध्ये 12 सप्टेंबर रोजी वाहन प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी लोकअदालत
नांदेड, 07 सप्टेंबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील वाहन चालक व मालकांच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संबंधित प्रलंबित प्रतिवेदने तसेच ई-चलान प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे १२ सप्टेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात
कोर्ट लोगो


नांदेड, 07 सप्टेंबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील वाहन चालक व मालकांच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संबंधित प्रलंबित प्रतिवेदने तसेच ई-चलान प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे १२ सप्टेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या लोकअदालतीमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड येथील प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीच्या माध्यमातून निपटारा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित वाहन चालक व मालकांनी आपल्या वाहनाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी दि. १२ सप्टेंबर रोजी आयोजित लोकअदालतीमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.लोकअदालतीच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने जलद निपटारा करण्याची संधी वाहन चालक व मालकांना उपलब्ध झाली असून, संबंधितांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असेही प्रादेशिक परिवहन विभागाने कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande