
सोलापूर, 07 सप्टेंबर (हिं.स.)।
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाला दहा दिवस पूर्ण होत असतानाही सरकारने मागण्या मान्य केल्या नसल्याचा आरोप करत मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभर आंदोलनांची मालिका सुरू असताना आता सोलापुरातही रास्ता रोको आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.
मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सोलापूर-पुणे महामार्गावरील बाळे चौकाजवळ सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको करण्यात येणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, रास्ता रोकोमुळे सोलापूर-पुणे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड