धनगर समाजाची आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी
परभणी, 07 सप्टेंबर (हिं.स.)। धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी तसेच श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करावा व अन्य मागण्यासाठी सकल धनगर समाज जिंतूरतर्फे तहसीलदार शितल कच्छवे यांना निवेदन देण्यात आले.आमदार गो
धनगर समाजाची आरक्षणाची अंमलबजावणी करावी


परभणी, 07 सप्टेंबर (हिं.स.)।

धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी तसेच श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करावा व अन्य मागण्यासाठी सकल धनगर समाज जिंतूरतर्फे तहसीलदार शितल कच्छवे यांना निवेदन देण्यात आले.आमदार गोपीचंद पडळकर व धनगर समाज विचारमंचच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रभर राज्यव्यापी आक्रोश आंदोलन करण्यात आले आहे. त्यानुसार तहसीलदार यांचे द्वारा मुख्यमंत्री यांना धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीचे निवेदन सकल धनगर समाजातर्फे देण्यात आले. निवेदनात, शासनाने सर्वोच्च न्यायालयातील लढाई पूर्ण ताकदीने लढावी आणि निर्णय प्रतिकूल झाल्यास आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने ठोस प्लॅन बी तयार ठेवावा, संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करून ऐक्केवीस विश्वस्तापैकी किमान अकरा विश्वस्त अस्सल मेंडपाळ समाजातील असावेत आणि अध्यक्षही मेंढपाळ समाजातील असावा, मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील नवीन कनेक्टिंग लिंकला हुतात्मावीर सिंगरोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे त्याचबरोबर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर हे नाव मुंबईतील चर्चगेटला देण्यात यावे इत्यादी मागण्यांचा समावेश आहे . निवेदनावर सकल धनगर समाजातर्फे गजानन वऱ्हाड, प्रा. डॉ. प्रभाकर वजीर, ज्ञानेश्वर मार्कड आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande