
सोलापूर, 07 सप्टेंबर (हिं.स.)।
सोलापुरातील खंदक बागेत आज रविवारी शिव प्रबोधनाचा जागर रंगला आहे. छत्रपती शिवरायांच्या विचारांनी प्रेरित शेकडो मावळे या कार्यक्रमासाठी एकत्र आले असून, सुप्रसिद्ध शिव व्याख्याते तथा हिंदवी परिवारचे संस्थापक डॉ. शिवरत्न शेटे यांचे विशेष व्याख्यान सकाळी सुरु झाले.
या कार्यक्रमाला शेकडो Gen Z युवक-युवतींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली आहे. विशेष म्हणजे विविध क्षेत्रातील मान्यवरांसह महिला-भगिनींची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, स्वराज्याची संकल्पना, नेतृत्व, राष्ट्रनिष्ठा आणि आजच्या युवा पिढीची जबाबदारी यावर डॉ. शिवरत्न शेटे आपल्या प्रभावी शैलीत मार्गदर्शन करत आहेत.
शिवरायांच्या विचारांचा जागर आणि नव्या पिढीचा उत्स्फूर्त सहभाग, चिमण्याची किलबिल यामुळे खंदक बाग परिसरात शिवमय वातावरण निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड