तासिका तत्वावरील निदेशकांच्या नियुक्तीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव,, 07 सप्टेंबर (हिं.स.) कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे प्रवेश सत्र ऑगस्ट-२०२६ करिता विविध व्यवसायांमध्ये तासिका तत्वावरील निदेशकांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रत
तासिका तत्वावरील निदेशकांच्या नियुक्तीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन


जळगाव,, 07 सप्टेंबर (हिं.स.) कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे प्रवेश सत्र ऑगस्ट-२०२६ करिता विविध व्यवसायांमध्ये तासिका तत्वावरील निदेशकांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्या व आवश्यक कागदपत्रांच्या मूळ व साक्षांकित प्रती तसेच अर्जासह दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संस्थेत लेखी, प्रात्यक्षिक परीक्षा व मुलाखतीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहावे. उपस्थित उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा उपस्थिती भत्ता दिला जाणार नाही.

TDM (J&F), PPO, यांत्रिक डिझेल, यांत्रिक मोटारगाडी आणि फॉन्ड्रीमॅन या प्रत्येक व्यवसायासाठी एक पद उपलब्ध असल्याची माहिती प्राचार्य वाय. के. कुलकर्णी यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande