
धाराशिव, 07 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्हा युवा महोत्सवात नाट्य विभागाची ट्रॉफी पुन्हा एकदा जिंकल्याबद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसराचे संचालक रमेश चौघुले यांनी यशस्वी विद्यार्थी तसेच प्राध्यापकांचा सत्कार केला. नाट्यशास्त्र व लोककला विभागाचे विभागप्रमुख माहेश्वर कळलावे आणि शिक्षण विभागाच्या मनीषा असुरे यांनीही विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.या संघाची जबाबदारी डॉ.उषा कांबळे यांनी सांभाळली,तर नाटकासाठी आवश्यक नेपथ्याची जबाबदारी कैलास पुपुलवाड यांनी समर्थपणे पार पाडली.
जिल्हा युवा महोत्सवातील विविध कला प्रकारांमध्ये मिळविलेल्या या यशामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या धाराशिव उपपरिसरातील विद्यार्थ्यांनी नाट्यकलेतील आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis