पुणे रेल्वे मार्गावर १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरपर्यंत मोठा वाहतूक ब्लॉक
पुणे, 07 सप्टेंबर (हिं.स.)। पुणे रेल्वे विभागातील हडपसर-घोरपडी-पुणे (HDP-GCMC) तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या कामाला वेग येणार असून, या कामासाठी १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या प्री-नॉ
पुणे रेल्वे मार्गावर १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरपर्यंत मोठा वाहतूक ब्लॉक


पुणे, 07 सप्टेंबर (हिं.स.)। पुणे रेल्वे विभागातील हडपसर-घोरपडी-पुणे (HDP-GCMC) तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या कामाला वेग येणार असून, या कामासाठी १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या प्री-नॉन इंटरलॉकिंग (Pre-NI) आणि नॉन इंटरलॉकिंग (NI) कामासाठी टप्प्याटप्प्याने वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या ३१ ऑगस्ट रोजीच्या अभियांत्रिकी संदेशानुसार, या ब्लॉकमुळे पुणे, हडपसर, दौंड तसेच पुणे मार्गावरून धावणाऱ्या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.या कालावधीत एकूण ४२ गाड्यांच्या ९८ फेऱ्या रद्दकरण्यात आल्या आहेत. तर २५ गाड्यांच्या ३६ फेऱ्या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत. याशिवाय ३५ गाड्यांच्या ९९ फेऱ्या शॉर्ट टर्मिनेट किंवा शॉर्ट ओरिजिनेट करण्यात येणार आहेत. तसेच २२ गाड्यांच्या ७१ फेऱ्यांचे नियमन केले जाणार असून,१४ गाड्यांच्या २५ फेऱ्यांच्या वेळेत बदल(Reschedule) करण्यात आला आहे. हडपसर-घोरपडी-पुणे तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने हा मोठा वाहतूक ब्लॉक नियोजित केला आहे. त्यामुळे पुणे, हडपसर, दौंड, सोलापूर आणि बारामतीसह पुणे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.त्यामुळे प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी रेल्वेचे सुधारित वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande