राष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धा : धाराशिव व्हॉलीबॉल संघाने पटकावले विजेतेपद
छत्रपती संभाजीनगर, 08 सप्टेंबर, (हिं.स.)। आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित डी फार्मसी कॉलेज धाराशिव यांच्या वतीने गुरुवर्य कै. केशवराव तुकाराम पाटील (बाप्पा) यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त आयोजित ढकली व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली
अ


छत्रपती संभाजीनगर, 08 सप्टेंबर, (हिं.स.)। आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित डी फार्मसी कॉलेज धाराशिव यांच्या वतीने गुरुवर्य कै. केशवराव तुकाराम पाटील (बाप्पा) यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त आयोजित ढकली व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेला महाराष्ट्रासह तब्बल सहा राज्यांमधून ७० हून अधिक संघांनी सहभाग नोंदवला. दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेला खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उत्कृष्ट नियोजन, दर्जेदार सामने आणि खेळाडूंना मिळालेली उत्तम सुविधा यामुळे ही स्पर्धा विशेष ठरली.

या स्पर्धेत ४०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवत स्पर्धेची भव्यता वाढवली. धाराशिवसारख्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा केवळ राज्यातीलच नव्हे, तर भारतातील सर्वात मोठ्या व्हॉलीबॉल स्पर्धांपैकी एक ठरली असून, एवढ्या मोठ्या स्तरावर पारितोषिकांची रक्कम देण्यात येणे हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले.

स्पर्धेत यंदा तब्बल दहा पारितोषिके ठेवण्यात आली होती. विजेत्या संघाला ₹७१,१११, उपविजेत्या संघाला ₹५१,१११, तृतीय क्रमांकाच्या संघाला ₹३१,१११, तर चतुर्थ क्रमांकाच्या संघाला ₹११,१११ रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. याशिवाय पाचव्या ते दहाव्या क्रमांकाच्या संघांना प्रत्येकी ₹५,००१ रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.स्पर्धेत धाराशिव व्हॉलीबॉल संघाने विजेतेपद पटकावले. सोलापूर पोलीस संघाने उपविजेतेपद, आमेर सोलापूर संघाने तृतीय क्रमांक, तर जेजुरी संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande