
नवी दिल्ली, ८ सप्टेंबर (हिं.स.).भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ज्युनियर क्रिकेट समितीने ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील संघाविरुद्धच्या आगामी सामन्यांसाठी भारतीय १९ वर्षांखालील संघात दोन बदल केले आहेत. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आर्यन सावसानीचा रोहित यादवच्या जागी एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे, तर हरियाणा क्रिकेट असोसिएशनच्या तन्मय बलोदाची बहुदिवसीय सामन्यांसाठी रोहितच्या जागी निवड करण्यात आली आहे.
राजकोट आणि अहमदाबाद येथे ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील संघाविरुद्ध होणाऱ्या आगामी सामन्यांसाठी रोहित यादवची भारतीय १९ वर्षांखालील एकदिवसीय आणि बहुदिवसीय संघात निवड झाली होती. पण, वयाशी संबंधित विसंगतीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले आहे.
सुधारित भारतीय अंडर-19 वनडे संघ:
लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), यशवर्धन चौहान (उपकर्णधार), रजत बघेल (यष्टीरक्षक), आर्यवीर सेहवाग, व्ही.के. विनीत, कुशाग्र ओझा, अर्जुन राजपूत, मनाल चौहान, अन्वय द्रविड (यष्टीरक्षक), व्ही. यशवीर, शविन विनोद, मोहित उलवा, चिगुरुपती व्यंकट, काव्या पटेल, आर्यन सवसानी.
भारताच्या अंडर-19 चा सुधारित बहु-दिवसीय संघ:
यशवर्धन चौहान (कर्णधार), लक्ष्य रायचंदानी (उपकर्णधार), सागर विर्क, कुशाग्र ओझा, मनाल चौहान, कुश पटेल, मानव कृष्णा (यष्टीरक्षक), अभिप्रय बिस्वास (यष्टीरक्षक), इशान ओम, अयान अक्रम, प्रणव राघवेंद्र, प्रियांशू सिंग, मोहित उलवा, आर्यन यादव, तन्मय बालोदा.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे