Custom Heading

अमेरिकेतील शॉपिंग मॉलमध्ये गोळीबार, दोघांचा मृत्यू
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर (हिं.स.) अमेरिकेतील नॉर्थ मिलवॉकी येथील एका शॉपिंग मॉलमध्ये गोळीबार करण्यात आ
संग्रहित


नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर (हिं.स.) अमेरिकेतील नॉर्थ मिलवॉकी येथील एका शॉपिंग मॉलमध्ये गोळीबार करण्यात आला. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी संशयित हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी हल्लेखोर आणि पोलिसांमध्ये गोळीबार झाला. यात एक अधिकारीही जखमी झाला. पोलीस घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच एकाची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर मॉल पूर्णपणे रिकामी करण्यात आला. हल्लेखोराने हा हल्ला का केला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande