ईराणने ताब्यात घेतले इस्त्रायली मालवाहू जहाज
जहाजावर 17 भारतीय देखील अडकल्याने तणाव होमुर्झ, 13 एप्रिल (हिं.स.) : इराणी निमलष्करी दल असलेल्या रि
ईराणने ताब्यात घेतले इस्त्रायली मालवाहू जहाज


जहाजावर 17 भारतीय देखील अडकल्याने तणाव

होमुर्झ, 13 एप्रिल (हिं.स.) : इराणी निमलष्करी दल असलेल्या रिव्होल्यूशनरी गार्डच्या कमांडोनी आज, शनिवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इस्त्रायली मालवाहू जहाजावर छापा टाकला. इराणने हे जहाज ताब्यात घेतले असून जहाजाच्या क्रूमध्ये 17 भारतीयांचा समावेश आहे. ईराणच्या या कारवाईमुळे या भागातील तणाव आणखी वाढला आहे.

ईराणने जहाज ताब्यात घेतल्याचे जाहीर केल्यानंतर इराणला ‘परिणाम’ भोगावे लागतील, असा इशारा इस्रायलच्या लष्कराने दिला आहे. ईराणच्या कृतीमुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे. ईराणला याचे परिणाम भोगावे लागतील, असे इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगरी यांनी एका निवेदनात म्हटले आहे. पोर्तुगीज ध्वजांकित मालवाहू जहाज एमएससी-एआराईजवरील 25 क्रू मेंबर्सपैकी 17 भारतीय आहेत. इतर क्रू सदस्यांमध्ये 4 फिलिपिनो, 2 पाकिस्तानी, एक रशियन आणि एक एस्टोनियन नागरिकांचा समावेश आहे. भारतीय नागरिकांची सुरक्षितता आणि लवकर सुटका सुनिश्चित करण्यासाठी भारत ईराणी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.

याबाबत सूत्राने सांगितले की, आम्हाला माहिती आहे की 'एमएससी एरीज' हे मालवाहू जहाज ईराणने ताब्यात घेतले आहे. जहाजावर 17 भारतीय नागरिक असल्याची माहिती मिळालीय. आम्ही सुरक्षितता, कल्याण आणि त्वरित सुटकेची खात्री करत आहोत. आम्ही तेहरान आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी राजनैतिक माध्यमांद्वारे इराणी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. ईराणमधील सरकारी माध्यमांनी देखील जहाज जप्त केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. यासंदर्भात व्हायरल व्हिडिओमध्ये ईराणी कमांडो शनिवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ हेलिकॉप्टरच्या मदतीने एका जहाजावर छापा टाकत असल्याचे दिसून आले. इराण आणि पाश्चात्य देशांमधील तणावादरम्यान घडलेल्या या घटनेसाठी पश्चिम आशियातील एका संरक्षण अधिकाऱ्याने इराणला जबाबदार धरले आहे. हा हल्ला व्हिडिओमध्ये पाहिला जाऊ शकतो, जो पूर्वी ब्रिटिश लष्कराच्या 'युनायटेड किंगडम मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स'ने नोंदवला होता. जहाजावरील एक क्रू सदस्य बाहेर येऊ नका असे म्हणताना ऐकू येतेय.हे जहाज लंडनस्थित झोडियाक मेरीटाईमचे कंटेनर जहाज आहे. झोडियाक मेरीटाईम हे इस्रायली अब्जाधीश इयाल ऑफरच्या झोडियाक ग्रुपचा भाग आहे. ईराण आणि पाश्चिमात्य देशांमधील वाढलेल्या तणावादरम्यान ही घटना घडली आहे, विशेषत: सीरियातील ईराणी वाणिज्य दूतावासावर इस्रायलच्या संशयित हल्ल्यानंतर. ईराणने जहाज ताब्यात घेतल्याची कबुली दिली आहे. ईराणने 2019 पासून जहाजे ताब्यात घेण्याच्या अनेक घटना घडवून आणल्या आहेत. ते आपल्या आण्विक कार्यक्रमाला झपाट्याने पुढे नेत आहे आणि पाश्चात्य देशांसोबतच्या वाढत्या तणावादरम्यान जहाजांवर अनेक हल्ले झाले आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande