जगप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर कोसळली वीज, जाणवले ४.८ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के
* नुकसानीचे वृत्त नाही न्यूयॉर्क, ६ एप्रिल (हिं.स.) : न्यूयॉर्क शहरातील जगप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्
स्टॅच्यु ऑफ लिबर्टी 


* नुकसानीचे वृत्त नाही

न्यूयॉर्क, ६ एप्रिल (हिं.स.) : न्यूयॉर्क शहरातील जगप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर गुरुवारी वीज कोसळली. त्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. दरम्यान वीज कोसळल्यानंतर ४.८ रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाच्या धक्क्याने शहर आणि आजूबाजूचा प्रदेश हादरला आहे.

गेल्या दोन दिवसांच्या कालावधीत दोन दुर्मिळ नैसर्गिक घटना घडल्या असून, याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लेबनॉन, न्यू जर्सीजवळ केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपाचे धक्के न्यूयॉर्क मेट्रोपॉलिटन शहरासह इतर ठिकाणी देखील जाणवले. भूकंपामुळे मोठे नुकसान झाल्याचे अद्याप वृत्त नाही.

भूकंपामुळे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पूर्णपणे हलू लागला. याशिवाय न्यूयॉर्क आणि फिलाडेल्फियाच्या गगनचुंबी इमारतींमध्येही भयंकर कंपने जाणवली. यामुळे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी किंवा कोणत्याही इमारतीचे नुकसान झाले नसले तरी याचे फोटो आणि व्हिडिओ पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, हा भूकंप गेल्या पाच दशकांतील तिसरा सर्वांत मोठा भूकंप होता. तर न्यू जर्सीमध्ये २४० वर्षांनंतर इतक्या क्षमतेचा भूकंप झाला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande