ऑस्ट्रेलियाचे नौदल प्रमुख व्हाईस ॲडमिरल मार्क हॅमंड भारत दौऱ्यावर
नवी दिल्ली, 3 एप्रिल (हिं.स.) - ऑस्ट्रेलियाचे नौदल प्रमुख व्हाईस ॲडमिरल मार्क हॅमंड यांनी भारताच्या
Australian Navy Chief


Australian Navy Chief


नवी दिल्ली, 3 एप्रिल (हिं.स.) - ऑस्ट्रेलियाचे नौदल प्रमुख व्हाईस ॲडमिरल मार्क हॅमंड यांनी भारताच्या अधिकृत दौऱ्यादरम्यान, 3 एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे भारतीय नौदलाचे प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार यांच्याशी संवाद साधला. दोन्ही देशांदरम्यान वाढीव परिचालन, प्रशिक्षण देवाणघेवाण, माहितीची देवाणघेवाण यांसह द्विपक्षीय सागरी सहकार्य मजबूत करण्याच्या संधींबाबत यावेळी चर्चा झाली.

तत्पूर्वी, आज सकाळी व्हाईस ॲडमिरल मार्क हॅमंड यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले आणि त्यानंतर नवी दिल्ली मधील साउथ ब्लॉक येथे भारतीय नौदलाकडून पारंपरिक मानवंदना देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. 2 ते 6 एप्रिल दरम्यान आपल्या भारत दौऱ्यात ते नवी दिल्ली येथे चीफ ऑफ डिफेन्स, हवाई दल प्रमुख आणि संरक्षण सचिव यांची भेट घेणार आहेत.

व्हाईस ॲडमिरल मार्क हॅमंड भारतीय नौदलाच्या दक्षिण नौदल कमांड (कोची येथे) आणि पश्चिम नौदल कमांड (मुंबई येथे) भेट देणार असून तेथील कमांडर-इन-चीफ्स बरोबर संवाद साधणार आहेत. तसेच ते आय एन एस विक्रांत, द्रुव सिम्युलेटर, एन डी (एम बी आय) आणि माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ला देखील भेट देणार आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हिंद प्रशांत क्षेत्रातील अनेक समकालीन सागरी सुरक्षा मुद्द्यांबाबत सामायिक दृष्टिकोन आहे आणि हिंद महासागर नौदल परिषद (IONS), इंडियन ओशन रिम असोसिएशन (IORA), पश्चिमी प्रशांत नौदल परिषद (WPNS), आसियान संरक्षण मंत्र्यांची बैठक (ADMM Plus) आणि क्वाड यांसारख्या अनेक द्विपक्षीय आणि बहुपक्षीय मंचांवर एकत्र काम करत आहेत.

मिलन 24 दरम्यान रॉयल ऑस्ट्रेलियन जहाज HMNAS वारामुंगाचा यशस्वी सहभाग आणि अलीकडेच आयोजित सागरी सरावानंतर लगेचच ऑस्ट्रेलियाच्या नौदल प्रमुखांच्या दौऱ्यामुळे दोन्ही नौदलांमधील मजबूत आणि दीर्घकालीन द्विपक्षीय संबंध अधिक दृढ झाले आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande