येऊर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकबॉल इनडोअर ऑलवेदर क्रिकेट अकॅडमीचे उद्घाटन
ठाणे, 16 सप्टेंबर (हिं.स.) ठाण्यातील येऊर येथील ग्लोडन स्वान कंट्री क्लब येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्य
येऊर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकबॉल इनडोअर ऑलवेदर क्रिकेट अकॅडमीचे उद्घाटन


ठाणे, 16 सप्टेंबर (हिं.स.) ठाण्यातील येऊर येथील ग्लोडन स्वान कंट्री क्लब येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकबॉल इनडोअर ऑलवेदर क्रिकेट अकॅडमीचे आज उद्घाटन संपन्न झाले. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री उदय सामंत, आमदार संजय पोतनिस, महापौर नरेश म्हस्के, भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, माजी यष्ठीरक्षक - फलंदाज सुलक्षण कुलकर्णी, स्थायी समितीचे माजी सभापती सुधाकर चव्हाण आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हे उद्घाटन संपन्न झाले.ठाण्यातील येऊर येथील ग्लोडन स्वान कंट्री क्लब येथे मराठमोळ्या आदित्य खांडके या तरुणाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकबॉल इनडोअर ऑलवेदर क्रिकेट अकॅडमीची निर्मिती केली आहे. या अकॅडमीची निर्मिती करताना अत्यंत बारकाईने विचार करण्यात आला आहे. या इनडोअर अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे रूफ (छताचा भाग) आहे. या रूफमुळे सूर्यप्रकाश भरपूर मिळतो पण त्याची दाहकता खेळाडूंना जाणवत नाही. हे रूफ सर्व ऋतुमध्ये खेळाडूंसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे खेळाडूंना वर्षाचे बाराही महिने खेळाचा आनंद लुटता येणार आहे.

एकाच छताखाली पाच विभागात खेळपट्टी उभारण्यात आली आहे. पहिली खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त आहे. गोलंदाजांसाठी गोलंदाजी करताना धावपट्टी महत्वाची असते. या पहिल्या खेळपट्टीवर गोलंदाज त्याच्या अपेक्षेप्रमाणे मोकळा रनअप घेऊन गोलंदाजी करू शकतो. दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या खेळपट्टीवर अत्याधुनिक बॉलिंग मशीन बसविण्यात आली आहे. या मशीनचे वैशिष्ट्य म्हणजे १६० किलो मीटर प्रति तास या वेगाने गोलंदाजी मशीन करते. वेगवान उजवा, डावखुरा आणि फिरकी गोलंदाजाची या मशीन मध्ये निवड करता येते. १६० किलो मीटर प्रति तास या वेगाने जरी चेंडू या मशीनवर आदळला तरी मशीनला कोणताही धोका नाही. व्यावसायिक फलंदाजांसाठी जगातील ही पहिली मशीन आहे. या मशीन मध्ये खेळाडू प्रत्यक्ष गोलंदाजी करत असल्याची प्रतिमा दिसते. जी फलंदाजासाठी उपयुक्त आहे आणि त्यांच्या फलंदाजीचा कस येथे लागणार आहे. एकाच वेळी ५० चेंडू या मशीन मध्ये टाकल्यानंतर ही मशीन गोलंदाजी करते. एकूणच येथे सराव करुन राष्ट्रीय आणि देश पातळीवरचे खेळाडू निर्माण होऊ शकतात. उदयोन्मुख खेळाडूंसाठी ही अकॅडमी वरदान ठरणार असल्याची प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी दिली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande