औरंगाबाद : नियो मेट्रोच्या डीपीआरचे 10 फेब्रुवारीला सादरीकरण
औरंगाबाद, 5 फेब्रुवारी (हिं.स.) वाळूज ते शेंद्रा एमआयडीसी दरम्यान वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी अखंड
औरंगाबाद : नियो मेट्रोच्या डीपीआरचे 10 फेब्रुवारीला सादरीकरण


औरंगाबाद, 5 फेब्रुवारी (हिं.स.) वाळूज ते शेंद्रा एमआयडीसी दरम्यान वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी अखंड उड्डाणपूल आणि नियो मेट्रोचा सुधारीत डीपीआर रेल्वेच्या महामेट्रोने तयार केला आहे. सीएमपी आणि डीपीआरचे 10 फेब्रुवारी रोजी सादरीकरण केले जाणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन कंपनीने सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी महामेट्रो मंडळाला डीपीआर करण्याचा कार्यारंभ आदेश दिला. महामेट्रोने शहराचा गतिशीलता आराखडा तयार केला. सोबतच मेट्रोचा डीपीआर देखील बनवण्यात आला आहे. वाळूज ते शेंद्रा एमआयडीसीपर्यंत अखंड उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. हा पूल डबलडेकर राहणार असून त्यावरून वाहतूक आणि मेट्रोदेखील धावणार आहे. या डीपीआरचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर त्यामध्ये अनेक सुधारणा सुचवण्यात आल्या होत्या. विविध विभागांच्या सूचना विचारात घेऊन त्यानुसार डीपीआर तयार करण्याच्या सूचना महामेट्रोला केल्या होत्या. महामेट्रोेने नियोमेट्रोसह गतिशिलता आराखडा यामध्ये बदल करून त्यात सुधारणा करण्यात आली आहे. या डीपीआरचे सादरीकरण आता 10 फेब्रुवारी रोजी प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासमोर केले जाणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande