मुरलीधर मोहोळ व्यापाऱ्यांच्या समस्या सक्षमपणे मांडतील - पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ
पुणे, 26 एप्रिल (हिं.स.) व्यापारी वर्गाच्या अनेक अडचणी आणि समस्या असून भारतीय जनता पक्षाचे पुणे लोकस
मुरलीधर मोहोळ व्यापाऱ्यांच्या समस्या सक्षमपणे मांडतील - पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ


पुणे, 26 एप्रिल (हिं.स.) व्यापारी वर्गाच्या अनेक अडचणी आणि समस्या असून भारतीय जनता पक्षाचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ या समस्या लोकसभेत प्रभावीपणे मांडतील असा विश्वास व्यक्त करत पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाने मोहोळ यांना पाठींबा जाहीर केला आहे.

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ ही पुणे जिल्हा मधील सर्वात मोठी व्यापारी संघटना असून पुणे शहरातही संघटनेचे मोठे जाळे असून संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुणे आहेत. मोहोळ यांनी व्यक्तिगतरित्या नेहमी व्यापारी वर्गाला व संघटनेला वेळोवेळी सहकार्य केले आहे.

व्यापारी वर्गाच्या अडचणी समस्या ते नक्की लोकसभेत मांडतील त्यासाठी त्यांना लोकसभा निवडणुक – २०२४ साठी संघटनेच्या वतीने व पुणे लोकसभा मतदार संघातील सर्व व्यापार्यांच्या वतीने आम्ही जाहीर पाठींबा देत असल्याचे संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande