स्थानकाच्या बाहेरूनही काढा 'यूटीएस' तिकीट
पुणे 26 एप्रिल (हिं.स) रेल्वे प्रशासनाने यूटीएस मोबाइल ॲपद्वारे तिकीट बुक करण्यासाठी अंतराच्या निर
स्थानकाच्या बाहेरूनही काढा 'यूटीएस' तिकीट


पुणे 26 एप्रिल (हिं.स) रेल्वे प्रशासनाने यूटीएस मोबाइल ॲपद्वारे तिकीट बुक करण्यासाठी अंतराच्या निर्बंधात शिथिलता आणली आहे. आता प्रवाशांना स्थानक परिसरातूनही ॲपच्या माध्यमातून जनरल तिकीट काढता येणार आहे. त्यासाठी त्यांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता भासणार नाही.रेल्वे प्रशासनाने तिकीट खिडकीवर होत असलेली प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी यूटीएस मोबाइल अॅप सुरू केले. त्याला मुंबई वगळता फारसा चांगला प्रतिसाद लाभला नाही. प्रवाशांना ॲपवरून तिकीट काढण्यासाठी पूर्वी उपनगरीय स्थानकांसाठी पाच किलोमीटरची मर्यादा होती. तर गैर उपनगरीय स्थानकांसाठी तिकीट काढण्यासाठी २० किलोमीटरची मर्यादा होती. प्रवासी संबंधित रेल्वे स्थानकापासून एवढ्या अंतरावर असतील तरच त्यांना यूटीएस तिकीट मिळत असे. मात्र, त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने अंतराच्या निर्बंधांवर शिथिलता आणली आहे. आता प्रवासी फलाटापासून ३० मीटर अंतरावर असेल तरीदेखील त्यांना तिकीट बुक करता येईल. विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी पकडल्यावर ते या सुविधेचा गैरफायदा घेऊ नये, याकरिता रेल्वे प्रशासनाने स्थानकापासून दूर असतानाच तिकीट बुक करण्याचे निर्बंध घातले होते. ते निर्बंध दूर करण्यात आले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande