छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ शहरभरात मोहीम
छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च, (हिं.स.) सकल हिंदू एकत्रिकरण समितीतर्फे छत्रपती संभाजीनगर नावाच्या समर्
छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ शहरभरात मोहीम


छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च, (हिं.स.) सकल हिंदू एकत्रिकरण समितीतर्फे छत्रपती संभाजीनगर नावाच्या समर्थनार्थ शहरभरात सूचना पत्रांची मोहीम राबवली जात आहे. याअंतर्गत अठरा वर्षांवरील नागरिकांकडून सूचनापत्राचे अर्ज भरून घेतले जात आहे. शहरातील जवाहर कॉलनी, त्रिमूर्ती चौक परिसरातही ही मोहीम राबवण्यात आली.

शासनाने छत्रपती संभाजीनगर नामकरणाबाबत आक्षेप व सूचना दाखल करण्यासाठी मुदत दिली आहे. या मुदतीत आक्षेप व सूचना दाखल करण्यासाठी शहरभरात विविध संस्था व संघटनांकडून मोहीम राबवली जात आहे. यात सकल हिंदू एकत्रिकरण समितीकडूनही मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत शहराच्या विविध भागांत नागरिकांतून सूचनापत्राचे अर्ज भरवून घेतले जात आहे. यासाठी नागरिकांकडून सूचना पत्रासोबत आधार कार्डची प्रत देखील घेतली जात आहे. नुकतीच जवाहर कॉलनी, त्रिमूर्ती चौकातही ही मोहीम राबवण्यात आली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande