आचारसंहिता भंग तक्रारी प्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट
मुंबई, २६ एप्रिल (हिं.स.) : निवडणूक आचारसंहिता भंग प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांना क्लीन चिट मिळ
अजित पवार 


मुंबई, २६ एप्रिल (हिं.स.) : निवडणूक आचारसंहिता भंग प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांना क्लीन चिट मिळाली आहे. अजित पवारांनी बोलताना निधी वाटपाबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्या विरोधात शरद पवार गटाने तक्रार दाखल केली होती.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी (रिटर्निंग ऑफिसर) कविता द्विवेदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्या वक्तव्यावर क्लीन चिट दिली आहे. अधिकार्याने राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेल्या अहवालात अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातील सभेत केलेल्या वक्तव्यामुळे आदर्श आचारसंहितेचा कोणताही भंग झाला नसल्याचे नमूद केले आहे.

निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी या पत्रकात सांगितले आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ वारंवार पाहिला. यामध्ये मला आढळून आले आहे की आदर्श आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन झाले नाही. अजित पवार यांनी कोणत्या पक्षाचे किंवा उमेदवाराला मते द्यायची हे सांगितले नाही. व्हिडिओमध्ये, उपमुख्यमंत्री अजित पवार मतदारांना ईव्हीएमसाठी मतदान करण्यास सांगत असल्याचे ऐकले आहे… विशिष्ट उमेदवार किंवा पक्षाला मत द्या, असे ते म्हणालेले नाहीत. त्यामुळे हे कोणत्याही आचारसंहितेचे उल्लंघन होत नाही. मी हा अहवाल जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे पाठवला आहे, जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत आणि त्याची प्रत राज्य निवडणूक आयोगाला देखील पाठवली आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

काय लागेल को निधी द्यायला सहकार्य करू, पाहिजे तेवढा निधी देतो, पण मशीनमध्ये बटण दाबा कचाकचा, म्हणजे मलाही बरे वाटेल. नाही तर माझा हात आखडता होईल, असं वक्तव्य अजित पवार यांनी इंदापूरमध्ये डॉक्टर आणि वकिलांच्या परिषदेत बोलताना केलं होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करत गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande