रत्नागिरीतील वाशिष्ठी नदी संवर्धनासाठी निधी देण्याची प्रचार मेळाव्यात मागणी
रत्नागिरी, 26 एप्रिल, (हिं. स.) : महायुतीचे उमेदवार नारायण राणे निवडून आल्यास चिपळूणचा महापूर आणि वा
रत्नागिरीतील वाशिष्ठी नदी संवर्धनासाठी निधी देण्याची प्रचार मेळाव्यात मागणी


रत्नागिरी, 26 एप्रिल, (हिं. स.) : महायुतीचे उमेदवार नारायण राणे निवडून आल्यास चिपळूणचा महापूर आणि वाशिष्ठी नदीच्या संवर्धनासाठी पुरेसा निधी द्यावा, अपेक्षा मागणी चिपळूणच्या लोकप्रतिनिधींनी प्रचार मेळाव्यात केली.

महायुतीचे उमेदवार राणे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन काविळतळी येथे करण्यात आले. यावेळी आमदार शेखर निकम आणि माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी राणे यांच्याकडून कोकणच्या विकासाबद्दल असलेल्या अपेक्षा आणि त्यांनी केलेल्या विकासकामांची माहिती दिली.

आमदार निकम यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी राणे यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले. ज्याप्रमाणे सिंधुदुर्गाचा विकास झाला त्या पद्धतीने येथील विकासासाठी ते तळमळीने काम करतील. चिपळूणचा पूर आणि नदी संवर्धन प्रश्न हा महत्त्वाचा आहे. कोल्हापूर, सातारा, सांगलीला केंद्राकडून मोठा निधी मिळाला, तसा निधी चिपळूणला मिळण्यासाठी राणे यांच्याकडून चिपळूणवासीयांच्या अपेक्षा आहेत. मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य मिळण्यास कोणतीही हरकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

माजी आमदार सदानंद चव्हाण यांनीही केंद्रीय मंत्री राणे आणि त्यांच्या माध्यमातून झालेला कोकणचा विकास याचा उल्लेख करत या निवडणुकीत मतदारसंघातून महायुतीचे सर्व घटक पक्ष जोमाने काम करत असल्याचे सांगितले. चिपळूणमधून मोठे मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande