क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून एकीचे दर्शन घडते - महापौर
अहमदनगर, 21 मार्च (हिं.स.):- क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून एकीचे दर्शन घडत असते.क्रीडा खेळाच्या माध्
क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून एकीचे दर्शन घडते


अहमदनगर, 21 मार्च (हिं.स.):- क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून एकीचे दर्शन घडत असते.क्रीडा खेळाच्या माध्यमातून व्यायामाची गोडी निर्माण होत असते.या धकाधकीच्या जीवनामध्ये मनुष्याचे आरोग्य सदृढ,निरोगी व आनंदी राह ण्यासाठी दररोज व्यायामाची खरी गरज आहे.मनुष्य नोकरी करत असताना त्याच्या जीवनामध्ये ताण तणाव असतो.मनपाचे अधिकारी व कर्मचारी दररोज नगरकरांना विविध सुविधा उपलब्ध करून देत असतात.त्यांच्या माध्यमा तून समाजाची सेवा केली जाते.महापालिकेचे कर्मचारी ऊन वारा पावसात सुद्धा आपले कर्तव्य बजावत असतात.मनपा कर्मचारी हे नगरकरांना निरंतर सेवा देण्याचे काम करत असून या कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.

अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित क्रीडा महोत्सव स्पर्धेचे उद्घाटन महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते संपन्न झाले.

आयुक्त डॉ.पंकज जावळे म्हणाले की,महानगरपालिकेने पदाधिकारी,अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये विविध खेळाच्या स्पर्धा संपन्न होणार आहे.खेळाच्या माध्यमातून एकोपा निर्माण होत असतो. तसेच माऊली सभागृह येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत स्वच्छ अभियान व माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शहरांमध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.नगरकरांनी या अभियानामध्ये भाग घेऊन आपले शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी मदत करावी असे ते म्हणाले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande