जिल्हा पोलीस शिपाई (चालक) भरती लेखी परीक्षेची तारीख जाहीर
अकोला, २१ मार्च(हिं.स.) : सन २०२१ अकोला जिल्हा पोलीस शिपाई भरतीमध्ये पोलीस शिपाई (चालक) पदासाठी लेखी
जिल्हा पोलीस शिपाई (चालक) भरती लेखी परीक्षेची तारीख जाहीर


अकोला, २१ मार्च(हिं.स.) : सन २०२१ अकोला जिल्हा पोलीस शिपाई भरतीमध्ये पोलीस शिपाई (चालक) पदासाठी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक २६/०३/२०२३ रोजी सकाळी ०९.०० वाजता घेण्यात येणार आहे. पोलीस शिपाई (चालक) पदाकरीता लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पध्दतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध आहे. सदर परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी ०२ (दोन) तास अगोदर पोहोचणे आवश्यक आहे. या संदर्भात उमेदवारांना काही अडचण / समस्या असल्यास अकोला पोलीस यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेय.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande