विरोधक चिन व पाकिस्तानची भाषा बोलतात- डॉ.दिनेश शर्मा
मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.) : मोदी सत्तेतून बाहेर पडल्यास भारत कमकुवत होईल असे चीन आणि पाकिस्तानला वा
मुंबई भाजप संमेलन


मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.) : मोदी सत्तेतून बाहेर पडल्यास भारत कमकुवत होईल असे चीन आणि पाकिस्तानला वाटते. त्यामुळे ते मोदी आणि भारताच्या विरोधात गरळ ओकतात. दुर्दैवाने आमच्या येथील विरोधी पक्षाचे लोक त्यांची भाषा बोलत असल्याची घणाघाती टीका भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी डॉ. दिनेश शर्मा यांनी केली. मुंबईतील मुलूंड पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या समर्थनात आयोजित भाजप पदाधिकारी व कार्यकर्ता संमेलनाला संबोधित करताना शर्मा बोलत होते.

यावेळी काँग्रेसवर टीकास्त्र सोडताना शर्मा म्हणाले की, काँग्रेसने आता देशातील जनतेविरुद्ध षडयंत्र रचण्यास सुरुवात केली आहे. त्याची वाईट नजर लोकांच्या मालमत्तेवर पडली आहे. देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे, असे डॉ. मनमोहन सिंग म्हणाले होते. काँग्रेसचे मनसुबे धोकादायक आहेत आणि त्यांना सामान्य लोकांची मालमत्ता बळकावून मुस्लिमांमध्ये वाटून टाकायची आहे. कोरोनासारख्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला नाही कारण भारतीय लोकांमध्ये बचत करण्याची वृत्ती आहे, जे अर्थव्यवस्थेचे सर्वात मोठे शस्त्र असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

काँग्रेस असा पक्ष आहे ज्याने रामाचे अस्तित्वही नाकारले होते. आता पहिल्या टप्प्यातील निवडणुकीनंतर काँग्रेसचे राजकारण तापत असताना काँग्रेस नेते राहुल आणि बहीण प्रियंका प्रभू रामाच्या दरबारात जाऊन नमस्कार करण्याचा विचार करत असल्याचे शर्मा म्हणाले. कर्नाटकात काँग्रेसने ओबीसींच्या आरक्षित जागांवर मुस्लिमांची भर्ती केली आहे. धर्माच्या आधारे आरक्षण देऊन काँग्रेसने डॉ. आंबेडकरांचा अपमान केल्याचे शर्मा यांनी सांगितले. काँग्रेस सुरुवातीपासूनच बाबासाहेबांच्या विरोधात असल्याचे शर्मा म्हणालेत. हल्लीच्या काळात सोशल मिडीया हे प्रभावी माध्यम असून सरकारच्या यशाची माहिती सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिली जावी. भाजपच्या मूळ मतदारांचे मतदान प्रत्येक बुथवर झाले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande