पुण्याला सुखी शहर बनवूया - रवींद्र धंगेकर
पुणे, 25 एप्रिल (हिं.स.) : गेल्या १० वर्षात पुण्याचे भाजपचे खासदार, भाजपचे ६ आमदार व भाजपचे १०० नगरस
पुण्याला सुखी शहर बनवूया - रवींद्र धंगेकर


पुणे, 25 एप्रिल (हिं.स.) : गेल्या १० वर्षात पुण्याचे भाजपचे खासदार, भाजपचे ६ आमदार व भाजपचे १०० नगरसेवक यांनी पुण्याचे नागरी प्रश्न सोडवत विकास केला असता तर पुण्यातील नागरी समस्या बिकट बनल्या नसत्या. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन विकास करण्याची ताकद आणि इच्छाशक्ती असणाऱ्या काँग्रेस पक्षाला मतदान करून आपल्या पुण्याला ‘सुखी शहर’ बनवूया, असे आवाहन महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांनी केले. पर्वती विधानसभा मतदार संघातील पदयात्रेच्या सांगते वेळी ते बोलत होते. या पदयात्रेचे नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. ठिकठिकाणी धंगेकरांचे औक्षण केले जात होते. तसेच पदायत्रेत सर्वांना पाणी दिले जात होते. अनेक सर्वाजीनिक मंडळांनी देखील धंगेकरांचे सत्कार केले काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मित्रपक्षांचे पदाधिकारी व नेते मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी होते तीनही पक्षांचे झेंडे डौलाने फडकत होते.

या पदयात्रेचा प्रारंभ मुकुंदनगर येथिल कचेरीचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते उद्घाटन करून झाला.

या पदयात्रेची सुरुवात मुंकूद नगर येथील निवडणुक कचेरीचे उद्घाटन करून - डायस प्लॉट - औद्योगिक वसाहत - महर्षीनगर - आदिनाथ सोसायटी - सातारा रोड - मार्केट यार्ड - आगरवाल डेअरी - सॅलसबरी पार्क - हाईट पार्क सोसायटी - गंगाधाम चौक येथे ही जीप/पदयात्रा समाप्त झाली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande