उद्धव ठाकरेंचा वचननामा नसून यूटर्ननामा आहे - चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, 25 एप्रिल, (हिं.स.) नकली सेनेचा आज प्रकाशित झालेला वचननामा नसून 'यूटर्ननामा' आहे. काँग्रेस आ
उद्धव ठाकरेंचा वचननामा नसून यूटर्ननामा आहे - चंद्रशेखर बावनकुळे


मुंबई, 25 एप्रिल, (हिं.स.) नकली सेनेचा आज प्रकाशित झालेला वचननामा नसून 'यूटर्ननामा' आहे. काँग्रेस आणि तुकडे तुकडे गॅंगचा अजेंडा पुढे रेटण्याचं दुर्दैवी काम उद्धव ठाकरेंना करावं लागतंय. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या वचननाम्यात वचक होता. आज मात्र उबाठाच्या ‘यूर्टननाम्या‘त फसवाफसवी आहे, अशा शब्दांत उबाठा गटाच्या जाहीरनाम्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे.

ते म्हणाले की, ज्यांची ओळख खंडणीखोर आणि १०० कोटी वसुली रॅकेट चालवणारे म्हणून आहे ते म्हणतात आम्ही लूट थांबवू. अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात ज्यांनी शेतकऱ्यांना कविडीही दिली नाही, फक्त घरात बसून राहिले ते म्हणतायत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ. उद्धव ठाकरे किती यूटर्न घेणार? महाराष्ट्रातील सुज्ञ जनता तुमच्या फसवाफसवीच्या ‘यूर्टननाम्या‘ला भुलणार नाही.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande