अवैध मासेमारी करणारी राजापूरची मच्छीमार नौका सिंधुदुर्गात ताब्यात
रत्नागिरी, 21 मार्च, (हिं. स.) : अवैधरीत्या पर्ससीन मच्छीमारी करणार्या साखरीनाटे (ता. राजापूर) येथील
अवैध मासेमारी करणारी राजापूरची मच्छीमार नौका सिंधुदुर्गात ताब्यात


रत्नागिरी, 21 मार्च, (हिं. स.) : अवैधरीत्या पर्ससीन मच्छीमारी करणार्या साखरीनाटे (ता. राजापूर) येथील मिनी पर्ससीन नौकेला मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्तीपथकाने विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) समुद्रात ताब्यात घेतले.

पर्ससीन मच्छीमारीला बंदी असतानाही बंदी आदेशाचा भंग करून पर्ससीन मच्छीमारी करणारी ही नौका विजयदुर्ग समुद्रात साडेआठ वावामध्ये पकडण्यात आली. मत्स्य व्यवसाय विभागाच्या शीतल गस्तीनौकेद्वारे फिरत असताना ही कारवाई करण्यात आली. ही नौका साखरीनाटे येथील अमिना इलियास मौसा यांच्या मालकीची असून पर्ससीन मासेमारी परवाना नसताना, नौकेची नोंदणी नसताना, नौकेवर नाव नसताना या नौकेद्वारे पर्ससीन मच्छीमारी केली जात होती. या नौकेवर मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाई केली असून ही नौका पुढील कारवाईसाठी विजयदुर्ग बंदरात आणून ठेवली आहे. नौकेवर १२ खलाशी आहेत.

ही कारवाई मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर, पोलीस कॉन्स्टेबल नीलेश पाटील, सागर सुरक्षा रक्षक धाकोजी खवळे, संतोष ठुकरूल, हरेश्वर खवळे, अमित बांदकर, योगेश फाटक, सुंदर घारकर यांनी केली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande