यवतमाळ : पुसद प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन
यवतमाळ, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। दिग्रस तालुक्यातील वसंतपुर येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वसंतपुर येथे पुसद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पस्तरीय क्रिडा स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांच्या हस्त
पुसद प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन


यवतमाळ, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। दिग्रस तालुक्यातील वसंतपुर येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वसंतपुर येथे पुसद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पस्तरीय क्रिडा स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणू शासकीय आश्रमशाळा वसंतपुरचे मुख्याध्यापक बलराज राठोड तर, प्रमुख अतिथी म्हणून पोलिस निरीक्षक सेवानंद वानखेडे उपस्थित होते. सर्वप्रथम महामानवाच्या प्रतिमेचे पुजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले.

या दरम्यान स्वागत गीत, नृत्य यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. बलराज राठोड व प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. तर, पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी प्रेरणादायी विचार मांडले. या प्रकल्पस्तरीय क्रिडा स्पर्धेमध्ये वसंतपुर व हर्षी या दोन्ही केंद्राच्या जवळपास 600 खेळांडुनी सहभाग नोंदविला.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande