राणी कदम ची वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेकरिता निवड
अहमदनगर, 16 ऑक्टोबर (हिं.स.):- अहमदनगर जिल्ह्यातील फुटबॉल खेळाडू राणी कदम हिची २९ व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.मुंबई येथे नुकत्याच झालेल्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल निवड चाचणीत कदम हिची उत्कृष्ट खेळाची कामगिरी पाह
राणी कदम ची वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेकरिता निवड


अहमदनगर, 16 ऑक्टोबर (हिं.स.):- अहमदनगर जिल्ह्यातील फुटबॉल खेळाडू राणी कदम हिची २९ व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.मुंबई येथे नुकत्याच झालेल्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल निवड चाचणीत कदम हिची उत्कृष्ट खेळाची कामगिरी पाहून तिच्यावर महाराष्ट्र (डब्ल्यूआयएफए) संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

जयपूर राजस्थान येथे होणाऱ्या राजमाता जिजाबाई चषक २०२४-२५ या २९ व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत कदम ही उपकर्णधार म्हणून महराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.या निवडीबद्दल अहमद नगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया,वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर,उपाध्यक्ष खालिद सय्यद,जोगासिंह मिनहास,सचिव रौनप फर्नांडिस,सहसचिव प्रदीप जाधव,विक्टर जोसेफ,खजिनदार ऋषपालसिंह परमार,सहखजिनदार रणबिरसिंह परमार आदींनी तिचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी राणी कदम हिचे अभिनंदन केले आहे.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande