भंडारा - अपघातात जखमी तरुणाला डॉक्टरांनी स्वतःच्या गाडीत घालून रुग्णालयात दाखल करत केले उपचार
भंडारा, 18 ऑक्टोबर (हिं.स.) - येथील डॉ. अतुल टेंभुर्णे यांनी माणुसकीचे दर्शन दाखवून दिले आहे. नागपूर भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील मुजबी जवळ अज्ञात व्यक्ती रस्त्याच्या कडेला पडून होता. अज्ञात वाहनांनी त्याला धडक देऊन पसार झाला होता. तर दुचाकीस
Accident


भंडारा, 18 ऑक्टोबर (हिं.स.)

- येथील डॉ. अतुल टेंभुर्णे यांनी माणुसकीचे दर्शन दाखवून दिले आहे. नागपूर भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील मुजबी जवळ अज्ञात व्यक्ती रस्त्याच्या कडेला पडून होता. अज्ञात वाहनांनी त्याला धडक देऊन पसार झाला होता. तर दुचाकीस्वार रक्तबंबाळ अवस्थेत पडून होता. नागपूरवरून भंडाऱ्याला येत असल्याने डॉ. टेंभूर्णे यांनी आपली चार चाकी गाडी थांबून त्या तरुणाला आपल्या गाडीमध्ये घातलं व जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल केलं. टेंभूर्णे स्वतः जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये डॉक्टर असल्याने त्यांनी या तरुणावर स्वतःच उपचार केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar


 rajesh pande