आमदार नरेंद्र भोंडेकरांचा शिंदे गटाला अप्रत्यक्ष इशारा
भंडारा, 18 ऑक्टोबर (हिं.स.) - भंडारा विधानसभा मतदार संघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. कारण महायुतीकडून भंडारा विधानसभेवर भाजपा, आरपीआय, पिरिपा यांनी सुद्धा दावा केलेला असल्याची चर्चा आता रंगू लागलेली आहे. त्यामुळे शिवसेना आमदार नरेंद्र भोंड
आमदार नरेंद्र भोंडेकरांचा शिंदे गटाला अप्रत्यक्ष इशारा


भंडारा, 18 ऑक्टोबर (हिं.स.) - भंडारा विधानसभा मतदार संघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. कारण महायुतीकडून भंडारा विधानसभेवर भाजपा, आरपीआय, पिरिपा यांनी सुद्धा दावा केलेला असल्याची चर्चा आता रंगू लागलेली आहे. त्यामुळे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांना तिकीट न मिळाल्याने ते अपक्ष लढू शकतात अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्या अनुषंगाने भोंडेकरांनी कार्यकर्ता मेळावा सुद्धा घेतलेला आहे. जर पक्षाने तिकीट नाकारली तर आपण अपक्ष लढण्याची तयारी असल्याची भोंडेकर बोलले आहे. त्यामुळे आता भंडारा विधानसभेवरून महायुती मिठाचा खडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar


 rajesh pande