साकोली मतदारसंघात राष्ट्रवादीचा दावा, स्थानिक भाजप नेतेही आग्रही
भंडारा, १८ ऑक्टोबर (हिं.स.) : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात वाद सर्वश्रुत या वादात आणखी ठिणगी पडणार आहे. कारण साकोलीत नाना पटोले विरोधात राष्ट्रवादी सुद्धा उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे. विदर्भातील हॉट सीट म्हणून स
साकोली मतदारसंघात राष्ट्रवादीचा दावा, स्थानिक भाजप नेतेही आग्रही


भंडारा, १८ ऑक्टोबर (हिं.स.) : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात वाद सर्वश्रुत या वादात आणखी ठिणगी पडणार आहे. कारण साकोलीत नाना पटोले विरोधात राष्ट्रवादी सुद्धा उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे.

विदर्भातील हॉट सीट म्हणून साकोली विधानसभा कडे पाहिले जाते या मतदारसंघात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले उमेदवार असल्याने भाजपाकडे त्यांना टक्कर देण्याकरिता सध्या तर उमेदवार नाही. तर दुसरीकडे ही जागा परंपरागत भाजपच्या वाटेला आहे. मात्र आता या जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गटांनी सुद्धा दावा केलाय. राष्ट्रवादीतर्फे अविनाश ब्राह्मणकर हे मतदार संघात गाठीभेटी घेत आहेत . भाजपचे स्थानीक नेते देखिल मतदार संघ पिंजून काढत आहेत. वरिष्ठ स्थरावरून प्रफुल्ल पटेल यांनी साकोलीची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात मागणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र आता याला स्थानीक भाजपा नेत्यांचा विरोध असल्याने जागा वाटपा आधीच साकोलीच्या जागेसाठी महायुतीत शीत युद्ध सुरू झालं आहे.

----

हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar


 rajesh pande